दोह्याचे प्रकार
दोहा एक मात्रिक सूत्रकाव्यप्रकार : डॉ. श्री. राम पंडित
दोहा , सोरठा आदी छंद दोन ओळींचे असतात.दोन ओळींचे चार हिस्से असतात . त्यास पाद असे म्हणतात . प्रथम ओळीचे दोन भाग पडतात .पहिला भाग १३ मात्रांचा व दुसरा भाग ११ मात्रांचाअसतो . तसेच दुसर्या ओळीचा पहिल भाग १३ मात्रांचा व दुसरा भाग ११ मात्रांचा असतो. म्हणजे ,दोन्ही ओळींत १३ व्या मात्रेवर ‘यति’ येतो.पहिल्या व तिसर्या म्हणजे विषम पादांत‘ ज ‘ गण येता कामा- -नये असा नियम आहे.शिवाय , दोन्ही ओळींच्या अंती लघुवर्णअ असावा लागतो.विषम पादांत (म्हणजे पहिल्या ओळीचा पहिला
हिस्सा आणि दुसर्या ओळीचा पहिला हिस्सा )अंती ‘ स ‘ गण ( ललगा ) , ‘ र ‘ गण (गालगा) किंवा ‘ न ‘ गण (ललल ) असावा लागलो.तसेच सम पादांत अंती ‘ ज ‘गण (लगाल ) किंवा ‘ त ‘ गण (गागाल ) असावा. दोह्याच्या उलट “सोरठा ” असतो. यात सम पाद तेरा मात्रांचे व विषम पाद अकरा मात्रांचे असतात . याचेदेखील तेवीस प्रकार आहेत . पण हा काव्यप्रकार दोह्याएकढा हिन्दी-व्यतिरिक्त प्रचलित झाला नाही.
अन्य छंदात दोन चरण लिहून त्यास दोहे संबोधणार्यांनी वा. न. सरदेसाईंच्या दोह्यांचा अभ्यास करून त्याप्रमाणे अचूक दोहे लिहावेत.
दोह्याचे अनेक प्रकार आहेत. पण त्यात २३ प्रकार प्रुमुख आहेत ते असे –
दोह्याचे प्रकार :
वृत्त क्र. | दोहाप्रकाराचे नाव | गुरुवर्ण – लघुवर्ण(दोन मात्रा- एक मात्रा ) | ह्याप्रकारातील दोहा | |
०१. | भ्रमर | |||
०२. | सुभ्रामर | २१ गा + ६ ल | ||
०३. | शरभ | २० गा + ८ ल | मातीच्या पेढीत | |
०४. | श्येन | १९ गा + १० ल | श्रीमंतापाशी खडा | |
०५. | मंडूक | १८ गा + १२ ल | माती धरते तापता | |
०६. | मर्कट | १७ गा + १४ ल | नेम निसर्गाचा | |
०७. | करभ | १६ गा + १६ ल | ज्ञानी तूच जितेपणी | |
०८. | नर | १५ गा + १५ ल | सूर्य कसा स्थिर एकटा | |
०९. | हंस | १४ गा + २० ल | उच्च पदावर | |
१०. | गयन्द / गदुकल | १३ गा + २२ ल | थोडेसे आयुष्यही | |
११. | पयोधर | १२ गा + २४ ल | ||
१२. | चल / बल | ११ गा + २६ ल | ||
१३. | वानर | १० गा + २८ ल | ||
१४. | शिकल | ०९ गा + ३० ल | ||
१५. | शार्दूल | ०६ गा + ३६ ल | ||
१६. | अहिवर | ०५ गा + ३८ ल | ||
१७. | व्याल | ०४ गा + ४० ल | ||
१८. | बिडाल | ०३ गा + ४२ ल | ||
१९. | श्वान | ०२ गा + ४४ ल | ||
२०. | उदर | ०१ गा + ४६ ल | ||
२१. | सर्प | सर्व ४८ लघुवर्ण | ||
२२. | कच्छप | ०८ गा + ३२ ल | ||
२३. | मच्छ | ०७ गा + ३४ ल | ||
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा