दु:खच कडवे व्हावे . .
सवलत घेतलेले अक्षरगणवृत्त : मातंगी
लक्षण : गागागा ! गागागा
दु:खच कडवे व्हावे . .
मी ते गीत म्हणावे !
पडक्या वाड्यावरती
तृण होउन डोलावे !
धनिक गुरांना कसचे
संस्काराचे दावे ?
माझ्याच खुन्यांची ही
नात्यामधली नावे .
चालत चालत आली
वेशीवरती गावे !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा