दिन संपले इथले अता . .

अक्षरगणवृत्त : संयुत
गण ललगालगा ललगालगा
छंदोरचना पृष्ठ क्र. २८१

दिन संपले इथले अता . .
क्षण मोजके उरले अता !

जग प्रेमबीम न जाणते . .
सरणासही पटले अता .

घडला असो परवा गुन्हा
पण , कायदे ठरले अता !

बहुतेक हे नकली ऋतू
सगळे खरे कुठले अता ?

विझवायचे ठरवा कधी
घर ते पुरे जळले अता !

सुख दुर्बिणीतुनि पाहिले . .
नसल्यापरी दिसले अता !

प्रतिक्रिया टाका