थोडे सुख आताच कुठे गावत आले . .

अक्षरगणवृत्त : शुभकामी
गण : गागालल गागालल गागालल गागा

 

थोडे सुख आताच कुठे गावत आले . .
अन् तोच कसे जीवनही संपत आले ?

 

सांगून खरे तोंड करू बंद जगाचे . .
वाटेल तसे लोक गडे , बोलत आले !

 

ह्या निद्रित लोकांस कुठे किंमत त्याची ?
सीमेवरचे सैन्य कसे जागत आले .

 

आहात गुन्हेगार तुम्ही . . आणिक तेही . .
सारेच गुन्हे जे तुमचे झाकत आले !

 

मस्तीत फुले सांडत जेथे गजर्‍याची ,
मी रोज तिथे जात टिपे गाळत आले !

.

प्रतिक्रिया टाका