थेंब नेत्री तुझ्या यायला हवा होता . .
मात्रावृत्त : भूपति
.
थेंब नेत्री तुझ्या यायला हवा होता . .
क्षणभरी पण कुणी आपला हवा होता !
ते तुझे लाजणे . . चंद्र व्हायचा जखमी . .
ह्याहुनी कोणता दाखला हवा होता ?
एकही मैत्र ना लाभला भल्यापैकी . .
एक वैरी तरी चांगला हवा होता !
मी जरी ‘ वाहवा ‘ जाहलो तुझ्या ओठी ,
फक्त आवाज तो ‘ आतला ‘ हवा होता !
वाळवंटापरी रुक्ष चित्र जन्माचे . .
ह्यात सोबत तुझा काफला हवा होता .
हात हाती जरी घेतलेस तू माझे . .
स्पर्श ‘ त्या ‘ वेळचा आजला हवा होता !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा