त्याला म्हणतात . .
टुणकन् नाकतोडया उडी मारतो
आपला अंदाज साफ चुकतो
मग आपण चोळतो गाल
त्याला म्हणतात . . स्पिन बॉल
आधाशी कावळा कर्कश ओरडे
भजं उडवा त्याच्याकडे
हवेत पकडतो चोचीनं
त्याला म्हणतात . . क्याच घेणं !
बिळाच्या बाहेर पडतो ससा
तेवढयात वजतो ढगाचा घसा
गोंधळून पडतात रडतराऊत
त्याला म्हणतात . . रन आऊट !
झा़कून ठेवली दूधसाय
हळूच बोका खाऊन जाय
आपलीच जेव्हा मोडते खोड
त्याला म्हणतात . . क्लीन बोल्ड !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा