तोडून पहावीत फुले आपणहून

गण – गागाल लगागाल लगागाल लगाल

 

तोडून पहावीत फुले आपणहून
काटा रुतल्यावीण न ये मोल कळून.
कष्टात समाधान असे जे जगण्यात,
ते काय मिळे निष्क्रिय आयुष्य जगून ?

प्रतिक्रिया टाका