ते वसंत जरी किती
वृत्त : रागिणी
ते वसंत जरी किती पाहिले जवळून मी
फक्त आठवता तुला , जातसे बहरून मी !
एकदा म्हटले तसे मी भल्याकरिता तुझ्या
बोललो तुजला कुठे सारखा उलटून मी ?
काल पानझडीमुळे सावली न दिली तुला . .
खंत जाळतसे उरी . . पर्णहीन अजून मी !
सांजवात अलीकडे कोण लावतसे तिथे ?
अंतरी इतका कसा चाललो उजळून मी ?
पापणीस अता गडे , राहिले न टिपूसही
नेत्रदान तुला कसे द्यायचे भि़जवून मी ?
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा