ते वसंत जरी किती

ते वसंत जरी किती पाहिले जवळून मी
फक्त आठवता तुला, जातसे बहरून मी !

 

पापणीस अता गडे , राहिले न टिपूसही
नेत्रदान तुला कसे द्यायचे भिजवून मी ?

प्रतिक्रिया टाका