तू आलीस रानी गुपित सांगाया ,

सूट घेतलेले अक्षरगणवृत्त : मेधावी
लक्षणे : गागागाल गागागाल गागागा
छंदोरचना पृष्ठ क्र.२८०

 

तू आलीस रानी गुपित सांगाया ,
की जमती कळ्या चोरून ऐकाया !

 

नाती जोडली जाती न यंत्राने . .
बाजारात का मिळते कुणा माया ?

 

झाला गर्व अपुल्या विविध रंगांचा . .
तों , दिसली फुलांना सावळी छाया !

 

मी आलो उगाळत कोळसा नुसता . .
सारा खेळ वाया . . वेळही वाया

 

नि: संकोच आता माग काहीही . .
आहे काय माझ्याशी तुला द्याया ?

 

——————————————-

प्रतिक्रिया टाका