सौ. ललिता बाठीया
गझल
तुला पाह्ता पुन्हा ऋतु हा उतास येउन फुलेलही
तुझ्या स्मॄतींचा जुनाच काटा पुन्हा नव्याने सलेलही
जगण्याच्या ह्या दु:खावरती खरा उतारा मिळे कुठे ?
उत्तर ह्याचे शोधण्यास मग पुन्हा जन्मणे असेलही
तहान ज्याची त्याला माहित , ओंजळ अथवा पुराघडा
धोधो पाणी मिळून सुद्धा कंठ कुणाचा सुकेलही
तुझ्या नि माझ्या भेटीमधल्या संदर्भाना असे वगळता
आयुष्यातिल रितेपणामग मुखवट्यातुनी दिसेलही
नसो निवारा , पाउस वारा ऊन असो वा थंडीही
सर्वांगाने भिडेल त्याला रहस्य ऋततुचे कळेलही
आठवणींना बंधन कुठले दिवसारात्री त्या छळती
ह्याजन्मी घ्या छळून घ्या मग देणे तुमचे फिटेलही
रे , आयुष्या सांग मलाही हेतू माझ्या जगण्याचा
गडबडलेल्या आयुष्याला नवेच कोडे सुचेलही.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा