तुफाने येउनी गेली . .
अक्षरगणवृत्त : प्रमीला
गण : लगागागा लगागागा
छंदोरचना पृष्ठ क्र. २७९
तुफाने येउनी गेली . .
जिवांशी खेळुनी गेली !
फुलांना जे हसू आले ,
टिपे गंधाळुनी गेली !
कशाला कोकिळा रानी
तराणे गाउनी गेली ?
घरी राहून केव्हाची . .
सुखे कंटाळुनी गेली !
नदी जी कोरडी होती ,
पुराने वाहुनी गेली ?
.
सदाची पालवी येथे . .
नवी आली . . जुनी गेली .
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा