तुझ्याचसाठी किती भोगते
तुझ्याचसाठी किती भोगते
विरहाचे वनवास
राया, मला जवळी तूच हवास !
तुझी काढता गोड आठवण
अंगावरती फुलते यौवन
वाटेवरती तुझ्या पसरला
मदनफुलांचा वास !
दरवाजावर थाप वाजते
वाजे पाउल, मन बावरते
उठून बघते . .अंगणदारी
उरतो केवळ भास !
तुझ्या मिठीचा अधीर विळखा
मस्त असावा मनासारखा
हळूच व्हावा सैल अखेरी
रात्रीच्या प्रहरास !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा