तिमिरात कोरले मी . .
तिमिरात कोरले मी हे चंद्र सूर्य तारे
उच्छवास श्वास माझे झाले दिगंत वारे . .
मी जागवीत जातो
स्वप्नातल्या कळीला
गंधात धुंद माझ्या
स्वच्छंद रंगलीला
मी एक प्रेमवेडा मज मुक्त सर्व दारे . .
कण एकही धुळीचा
माझेच बीज वाही
थेंबात पावसाच्या
माझीच शेज राही
मी एक ना कुणाचा . . माझे अशेष . . सारे . .
सौंदर्य सत्य शिव ही
माझी त्रिविध अंगे
माझ्याच अंगणाशी
हा विश्वखेळ रंगे
आधार -हात माझे कोणा हवेत का रे . . ?
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा