ता ना पी ही नी पा जा !

सात अक्षरांमधली जादू ,

पहायची का रंगमजा ?

ता ना पी ही नी पा जा !

 

ता – तांबडे , फुटे रेशमी

कुठे कोंबडा आरवतो

ना- नारिंगी  किरण ,छप्परे

घर कौलारू सारवतो

जाग येतसे घराघरांना ,

सुरु माणसांची ये – जा  !

 

पी – पिवळाई  उन्ह सांडते

शिवार हसते गालात

ही – हिरव्या , गवतात गुंफली

वाट वाकडी घाटात

तरंगणाऱ्या ढगांखालती ,

संथ सावल्यांच्या फौजा !

 

नी – निळसर आकाशी उमटे

इंद्रधनुष्याचा गोल

पा – पारवा आडोशाला

घुमवी गाण्यांचे बोल

जा – जांभळ्या डोंगरांतुनी

हळूच उतरे तिन्हिसांजा  !

 

प्रतिक्रिया टाका