डोळ्यांत चंद्र तुझिया . .
मात्रावृत्त : रसना ( विनोद द्विरावृत्ता )
लक्षणे : गा गालगाल गा+ , गा गालगाल गा+
( + म्हणजे निश्चित गुरू )
डोळ्यांत चंद्र तुझिया मज व्हायचेच होते . .
नाते निळ्या नभाशी जोडायचेच होते!
त्यांचे हवेत असता कित्येक राजवाडे ,
जमिनीस एक घरटे बांधायचेच होते !
खोटे , खरे कराया शिकले जिथे घराणे . .
ह्यांना कुठे धडे ते गिरवायचेच होते ?
ओठांस ओठ तुझिया अलवार टेकताना ,
फुलपाकळ्यांस थोडे चिडवायचेच होते !
इतक्यात प्राण माझा गेला अशाचसाठी . .
मी शब्द जे दिले , ते पाळायचेच होते !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा