श्री. सदानंद डबीर

गझल . .

आसवे टाळता आली , पण हसता आले नाही
मी नुसते सलाम म्हटले , मज झुकता आले नाही

कापूर उभ्या जन्माचा पेटून झरझरा जळला
जळतांना थोडेसेही दरवळता आले नाही

ते वसंत आले गेले , बहरल्या फुलांनी बागा
ह्या काट्यांच्या झाडाला पण फुलता आले नाही

धडधडीत सत्यालाही लागतो पुरावा येथे
न्यायालय त्यांचे होते , मज लढता आले नाही

माझाच चेहरा आता मज अंधुक अंधुक स्मरतो
मी खरा कसा होतो ते , आठवता आले नाहे.

मरणाच्या दारामध्ये खोटेच कशाला बोलू ?
मी कबूल करतो आहे , मज जगता आले नाही .

प्रतिक्रिया टाका