जो जो वठाया लागलो . .

अक्षरगणवृत्त : मंदाकिनी
ल़क्षणे : गागालगा गागालगा गागालगा गागालगा

 

जो जो वठाया लागलो , सारेच पक्षी पांगले . .
ते गर्दशी झाडी नवी शोधावयाला लागले !

 

का ह्या कळीचे फूल ना व्हावे पहाटे आजही ?
येशील तू , आशेत ह्या मी रात्र सारी जागले !

 

झाली मिळेनाशी जशी गावातुनीही उत्तरे ,
वेशीवरी स्वतः ते प्रश्न तेव्हा टांगले .

 

स्वार्थी जगाची एवढी पत्रास मीही का करू ?
की , कोण माझ्याशी खरे अन् कोण खोटे वागले .

 

एकास ज्याचे वावडे , अन्यास तेची आवडे . .
वाईट चोरा चांदणे . . वाटे , चकोरा चांगले !

 

.

प्रतिक्रिया टाका