जोडण्यासाठी जरी मी
वृत्त : कालगंगा
गण : गालगागा गालगागा गालगागा गालगा
(देवप्रिया ह्या अक्षरगणव्रुत्ताप्रमाणे )
जोडण्यासाठी जरी मी सोडतो काहीतरी
झुंज देणाराच अंती जिंकतो काहीतरी !
शपथ त्याने ‘ कागदां ‘ वर हात ठेउनि घेतली . .
तो म्हणे , गीतेससुद्धा मानतो काहीतरी . .
अर्घ्य ना देताच तुम्ही दीर्घ जीवन मागता !
काय , तुमचे सूर्य देणे लागतो काहीतरी ?
होतसे काहीतरी अन; औषधे काहीतरी . .
वैद्यही रोग्याप्रमाणे वाटतो काहीतरी
अब्रुदारच रोज जेव्हा नागवे होती इथे ,
मीच तो , जो आज लज्जा झाकतो काहीतरी .
मी नव्यापैकी नवेही घेत नाही फारसे
अन जुन्यापौकी जुनेही राखतो काहीतरी !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा