जीवन म्हणजे स्वप्न असावे . .
सवलत घेतलेले अक्षरगणवृत्त : रुक्मवती
लक्षणे गाललगागा ! गाललगागा
छंदोरचना पृष्ठ क्र. २५२
जीवन म्हणजे स्वप्न असावे . .
जाग जशी ये , दृश्य तुटावे !
कोण कुणाचे ऐकत असते ?
आपण अपले सांगत जावे !
ना इथला नात्यात कुणीही . .
पण , सगळी नात्यातिल गावे .
ऊन्ह नि छाया भांडत होते
सापडती का ह्यास पुरावे ?
कोमल असते हृदय फुलांचे . .
त्यांस ऋतूंचे कळव न कावे .
……
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा