जिथे जिथे मी . .

वृत्त : हिरण्यकेशी
गण  : लगालगागा  लगालगागा लगालगागा लगालगागा

 

जिथे जिथे मी रहात गेलो , तिथे तिथे थांबलोच नाही . .
निघून आलो जरी इथे मी, हवा तिथे पोचलोच नाही !

 

घरे तुम्हांसारखीच होती मिटून डोळ्यांपरी कवाडे . .
मुक्या कड्यांना बघून माझ्या मनातले बोललोच नाही !

 

खुशाल , चिंधी म्हणून जो तो , मला जरी  ठोकरून गेला ,
असून मी फूल जायबंदी , तसा कुणा वाटलोच नाही !

 

तुम्हीच मांडून ठेवलेला जगात बाजार चेहर्‍यांचा . .
खरे हसू मातिमोल येथे , म्हणून मी हासलोच नही !

 

उरी उमाळ्याशिवाय दिंडया कितीक दारावरून गेल्या . .
दुरून मी फक्त पाहिल्या अन् मधे कधी नाचलोच नाही !

 

.

प्रतिक्रिया टाका