जळाविना जगते मासोळी . . !

समस्यापूर्तीसाठी दिलेली ओळ 

जळाविना जगते मासोळी . . !

 

चवदा पानी वनवासाचा

पवित्रता ती लेख वाचते

अशोकवनिंची अशुभ शांतता

मूक होउनी मनांत हसते . .

 

अगतिकता नयनांत तरारे

कशा दिसाव्या पुढच्या ओळी

रामायण तें अपुरे म्हणुनी

जळाविना जगते मासोळी . . !

प्रतिक्रिया टाका