जरी आज भाग्यात सत्कार होता . .

वृत्त : भुजंगप्रयात
गण : लगागा लगागा लगागा लगागा

 

जरी आज भाग्यात सत्कार होता ,
मला निंदकांचाच शेजार होता !

 

तुझे प्रेम तोलून जेव्हा मिळाले ,
कळाले तुझा प्रेमबाजार होता.

 

दिव्याचे भले राज्य होते सभोती . .
दिव्याखालती मात्र अंधार होता !

 

कशाची दवा , औषधे पथ्यपाणी ?
मनाचा म्हणे , त्यांस आजार होता .

 

जरी त्याज्य वाटे अता कोळसा हा,
कधी सूर्यसा पूज्य अंगार होता !

 

अरे , लोक ते गप्प होते . . तरीही
तशांचा अबोलाच फूत्कार होता !

प्रतिक्रिया टाका