जरासे घाव टाकीचे . .
मात्रावृत्त : जीवकलिका
जरासे घाव टाकीचे तुम्हीही सोसले असते ,
कधीचे, अंग दगडाचे फुलांनी झाकले असते !
स्मृतीची पावले रात्री अचानक वाजली नसती ,
कुणासाठी उगा डोळे कशाला जागले असते ?
स्वतःला फसवितानाही किती आनंदतो आम्ही !
कुणाचे आरशातिल रूप ‘ सुंदर ‘ आपले असते !
खुली पळवाट चोरांना मिळाली . . तीच ना मिळती ,
अताच्या कायद्यांवर जग सुखाने चालले असते .
मला मारेकरी माझा कधी दिलदार आढळता ,
फुलांनी , त्या सुर्याला मी खुले शृंगारले असते !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा