चालता थकेन मी , न वाटले मला . .

अक्षरगणवृत्त : कलापति
गण : गालगाल गालगाल गालगाल गा

छंदोरचना पृष्ठ १८०

 

चालता थकेन मी , न वाटले मला . .
हे कसे जिणेच भार जाहले मला ?

 

जायचीस तू जरी खुणावुनी तशी . .
ना कळायचे कधीच त्यातले मला !

 

मी कशावरून ओळखायचे ऋतू ?
चेहर्‍यांविनाच सर्व भेटले मला !

 

का मला मधेच सोडलेस एकटे ?
शोधती अता तुझीच पावले मला .

 

कोरडीच राहिली म्हणून पापणी . .
दु:ख येतसे पिता मनातले मला !

.

प्रतिक्रिया टाका