चांदण्याचं गाणं . . .

अंगभर
भगवा वणवा
पांघरलेलं रान
एकाएकी गंभीर झालं .
ज्वाळेच्या जिभेवर
जीवनदायी
संदेश उमटला –

 

‘ सूर्य हो .
पेटता रहा .
पण , त्याच्यासारखा
असमाधानानं
जळत राहू नकोस . .

 

. . चांदण्याचं गाणंच
काय ते
त्याच्यापाशी नाहिये ! ‘

प्रतिक्रिया टाका