चहाचं तळं . .

हाताच्या बोटांवर
बशीच्या कुशीत
चहाचं तळं
वसलं खुशीत . .

 

तळ्याच्या काठावर
कमळांची नक्षी
नखाएवढे रंगीत
उडणारे पक्षी . .

 

तळ्यावर रांगतात
वाफेचे ढग
फुंकर मारून
हळूचकन् बघ . .

 

तळ्यामथे दिसतात
नाक आणि डोळे
भुरुभुरू उडणार्‍या
केसांचे चाळे . .

 

– असं हे तळं
कपातून बशीत
केव्हाकेव्हा हसतं
आजोबांच्या मिशीत !

 

 

प्रतिक्रिया टाका