श्री. मनोहर रणपिसे

गझल

आयुष्याने वेळोवेळी , असे चकवले होते
मला उत्तरे सापडल्यावर प्रश्न बदलले होते

जगण्याचे संदर्भ बदलले , बघता बघता सारे
दोन चार क्षण हातामधुनी फक्त निसटले होते

तू मनकवडी सांगितल्याविण तुला नेमके कळले
ओठावर येताना माझे शव्द हरवले होते

सुखे आणता सकियांनीती ओरबाडूनी नेली
दु:ख पुढे केल्यावर त्यांनी हात झटकले होते

हयातभर जे जमवित गेलो नुसती अडगळ होती
जाणार्‍यांचे हात रिकामे बघून कळले होते

प्रतिक्रिया टाका