चंद्रास आजही हे केवढे खळे !

सूट घेतलेले अक्षरगणवृत्त : प्रमद्धरा
लक्षणे : गा , गालगाल , गा ! गा , गालगाल , गा
छंदोरचना पृष्ठ क्र. १८२

 

 

चंद्रास आजही हे केवढे खळे !
माझा तुझ्याविना का जीव तळमळे ?

 

 

झुळुका पसंत मज नव्हत्याच जन्मतः
पचवून घेतली गर्भात वादळे !

 

 

प्रेमात द्यावया संधी तुला – मला ,
बघ , सूर्य ही जरा आधीच मावळे .

 

 

उद्ध्वस्त येथला हा घाट राहिला . .
अदृश्य ते निळ्या डोळ्यांपरी तळे !

 

 

दोघांस का कळे सारेच सारखे ?
काही तुला कळे . . काही मला कळे !

 

 

.

प्रतिक्रिया टाका