गोड ओझरते तसे स्मित

लगावली : गालगालल x 3 + गालगा ( छंदोरचना )

लगावली : गालगा + ललगालगा x 3 ( वृत्तदर्पण )

 

गोड ओझरते तसे स्मित सांडुनी बघतेस का ?
शिंपल्यावर चांदणे , मज त्यात पेटवतेस का ?

 

फोन मी करतो तुला, पण रिंग वाजत राहते . .
तू तुझ्या असता घरी , दुनियेत ह्या नसतेस का ?

 

हे खरे, तुजला जरी इतक्यात मीच न  भेटलो ,
काय , तू , म्ह्णुनी मला ठरवून नावडतेस का ?

 

तू नको सगळ्या ऋतूंसह वाच्यता अपुली करू . .
सांग , तू  झुळुकेबरोबर पत्र पाठवतेस का ?

 

आठवे मजला गडे , सुखस्वप्न आज पहाटचे ;
अन् अता कळले , अशी नुसतीच तू हसतेस का .

 

प्रतिक्रिया टाका