गेलें तेज कधीच लोपुनि तरी कां ही वृथा वल्गना ?
समस्यापूर्तीसाठी दिलेली ओळ
गेलें तेज कधीच लोपुनि तरी कां ही वृथा वल्गना ?
” ग्यावा भाग गमे मला प्रियकरा , सौदर्यस्पर्धेमधें
गोले सुंदरता , जरा सरकली जी चाळिशीच्या पुढें
चष्मा सावरुनी हळूच तिजला तो सांठवी दृष्टित
लांबोळा झणिं चेहरा बदलतां हो प्रश्नचिन्हांकित
थांबूनी क्षण नाथ तीस म्हणतो – ” स्पर्शी कशी कल्पना . .
गेलें तेज कधीच लोपुनि तरी कां ही वृथा वल्गना ? ”
( व्याकरण तेव्हाचे )
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा