गावात आज हे ते . .

मात्रावृत्त : विनोद
लक्षणे : एकूण १२ मात्रा  [ गा l गालगाल l गा + ] ( + म्हणजे निश्चित गुरू )

 

गावात आज हे ते . .
सारेच लोकनेते !

 

ये पीक बंगल्यांचे
चित्रांत मात्र शेते !

 

‘ होईल ‘ फक्त म्हणता !
सांगाल का कसे ते  ?

 

हलतो न जागचा मी . .
मज स्वप्न दूर नेते .

 

झुंजून ते हुतात्मे
वाचून हे विजेते !

 

का वीज झेलताना
माझीच याद येते !

 

.

प्रतिक्रिया टाका