गझलवेडी आज संध्याकाळ आहे
गण : गालगागा x ३
गझलवेडी आज संध्याकाळ आहे . .
मैफलीसाठी खुले आभाळ आहे ?
मैफलीचा केवढा जंजाळ आहे
गीत ओठांशी कसे घायाळ आहे !
चल गडे , इथल्या वसंताला विचारू . .
: का फुलांचा एवढा दुष्काळ आहे ?
लागलेला शांतही होतोच वणवा . .
हा वनाला लावलेला जाळ आहे !
लांबची ती वाट आहे चांगलीशी
जवळची असली तरी खडकाळ आहे
स्वार ते झाले तरी निर्धास्त कुठले ?
जिंदगी त्यांची नवी नाठाळ आहे !
पिंजर्यातिल पोकळी . . आकाश तुमचे
माझिया पंखावरी आभाळ आहे !
केवढीही का असेना त्यांस लोकर
एवढीशी, पण मला आयाळ आहे !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा