खाऊ . .
कोकणातली
आजी माझी
हापूसची फोड . .
नाशिकची
मावशी कशी
द्राक्षासारखी गोड . . !
श्रीखंडाची
वडी, तसा
वारणेचा मित्र . .
नागपूरची
आते म्हणजे
आंबटगोड संत्र !
पार्लेची
बिस्कीटं
दादा आणि आई !
रावळगावची
टौफी जशी
तशी माझी ताई !
घोलवडचा
मधूकाका
चिक्कू एक नंबर
खाऊच्या
खोक्यात त्याच्या
पुस्तकंच शंभर !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा