कोण फुंकून गेले तुतारी अता ?

अक्षरगणवृत्त : स्रग्विणी
गण : गालगा गालगा गालगा गालगा

छंदोरचना पृष्ठ क्र. १९३

 

कोण फुंकून गेले तुतारी अता ?
ये कशाने जिवाला उभारी अता ?

 

जीवनाचे कडू घोट प्यालो जरी ,
और ह्याही विषाची खुमारी अता !

 

‘ पाव्हनं , कोनत्या गावचं हायसा ? ‘
गाव त्यांचेच त्यांना विचारी अता .

 

छाटलेला शिवू दे मला पंख हा . .
अन् पहा फक्त माझी भरारी अता !

 

देत गेले जुने लोक काहीतरी . .
राहिली माणसे मागणारी अता !

 

संपले बाण केव्हाच भात्यातले . .
सावजे मात्र झाली शिकारीअता !

 

जीर्ण आयुष्य हे मी शिवावे किती ?
श्वास टाचून आली शिसारी अता !

 

. . .https://www.youtube.com/c/PramodSardesai

प्रतिक्रिया टाका