कैद मी तुझ्या मनात आहे . .

वृत्त : मयूरसारिणी
गण : गालगा लगालगा लगागा

 

कैद मी तुझ्या मनात आहे
मोकळे म्हणून गात आहे !

 

आज वेगळीच भासशी तू
की , अपूर्व चांदरात आहे ?

 

वादळा , तुझीच हार झाली
तेवती अजून वात आहे !

 

झाकण्यास मोडका तमाशा ,
फाटकी – उभी कनात आहे !

 

थेंब दोने – चार आठवांचे
तेवढ्या सुखात न्हात आहे !
एकट्या ढगास कोण साथी ?
रानपाखरू नभात आहे !

प्रतिक्रिया टाका