कुठून आले मोहक वादळ दाराशी . . .
गण : एकूण मात्रा २२ . ( ८ मात्रा + ८ मात्रा + ६ मात्रा )
कुठून आले मोहक वादळ दाराशी ?
गजर्याचा ये , अजून दर्वळ दाराशी !
कानी आले , कालच झाले लग्न तुझे
ऐकू आला रात्री गोंधळ दाराशी !
गंगा आली माझ्या गावी केव्हाची
आहे का पण साधा ओहळ दाराशी ?
दगडाला दगडाने उत्तर देण्याला,
दगडच नव्हता . . होता कातळ दाराशी !
सरत्या रात्री तुझ्या स्मॄतीचा पारिजात . .
करी रिकामी जखमी ओंजळ दाराशी !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा