का सुखासुखी झुरू . .

वृत्त : सुकामिनी द्विरावृत्ता
गण : गालगाल गालगा गालगाल गालगा

 

का सुखासुखी झुरू लागतात माणसे ?
संकटांतही कशी हासतात माणसे !

 

पंगतीस बैसले लोक आपले जरी ,
घास ही मनोमनी मोजतात माणसे !

 

माणसा , निसर्ग ना लागला चुकायला . .
माणसास शेवटी भोवतात माणसे !

 

वारियावरी अरे, शब्द लागले उडू !
शब्द आज कोणता पाळतात माणसे ?

 

लाच खात बंगले बांधुनी , अशांवरी . .
‘ स्वाभिमान ‘ नाव ही कोरतात माणसे !

 

रक्त सांडतात, त्या शूर सैनिकांप्रती
दोन आसवे तरी ढाळतात माणसे ?

प्रतिक्रिया टाका