का तुझ्या स्मृतींना खिळून बसलो आम्ही ?
वृत्त : भूपति
लक्षणे : एकूण मात्रा २२ ( – प प – + ) .
प म्हणजे ८ मात्रा . + म्हणजे निच्छित गुरू .
का तुझ्या स्मृतींना खिळून बसलो आम्ही ?
मन मजेत जखमी करून बसलो आम्ही !
टकमका प्रियेचे मुख चंद्राने बघता ,
जवळचा दिवा मालवून बसलो आम्ही !
अंगणात येता नशीब अपुल्या पायी ,
पायर्या घराच्या खणून बसलो आम्ही .
कोरडी सांत्वने तुझी मिळाली तेव्हा . .
पापणीस अश्रू टिपून बसलो आम्ही !
आमच्या पिढीतिल असंख्य झाडे वठली . .
अन् बघा , कसे मोहरून बसलो आम्ही !
‘ जाणत्या ‘ जगाचे पितळ पडावे उघडे ,
हे वेड पांघरत म्हणून बसलो आम्ही !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा