कागदी तुमच्या फुलांना . .

वृत्त   : मध्यरजनी 

लगावली :  गालगागा गालगागा गालगागा गालगा+ . ( + म्हणजे हमखास गुरू )

( कागदाच्याही फुलांना मी म्हणालो . . ‘ गंध ‘ आहे !

काय करता , ह्या जगाशी रोजचा संबंध आहे ! )

‘ कागदी तुमच्या फुलांना महकता मकरंद आहे ! ‘
रोज हा तोंडात माझ्या ठिबकता गुलकंद आहे .

मरतिके होऊन येती शव्द कानाच्या स्मशानी
प्राण आणुनि ऐकण्याची वाट आत बंद आहे .

थुंक बोटाची कशी ‘ ह्या ‘ फिरविती ‘ ते ‘ त्या वरीही ?
केवढे विद्वान ते अन् मी किती मतिमंद आहे !

जीभ असुनी बोलकी , मी सोंग आणावे मुक्याचे . .
मान डोलावीत बसणे हाच माझा छंद आहे !

सहज, श्वासातील दोरी तोडताही येत नाही . .
मी असा जगण्यात ह्यांना केवढा आनंद आहे !

.

प्रतिक्रिया टाका