Currently browsing category

हायकू

काही हायकू : कवी वा. न. सरदेसाई

  क्र. हायकू——————————————- ०१. मी फूल खुडलं त्याआधी त्याला डोळे भरून पाहिलं . ०२. दूर पडलेली लख्ख नदी मला वाटते चटदिशी इथूनच …

निळे जांभळे

निळे जांभळे दूरचे डोंगर दिसतात अगदी छापल्यासारखे सुंदर . .

पुष्कळ चमकतायत

पुष्कळ चमकतायत तारे पण . . त्यांतील एकच म्हणतोय् मला अरे-कारे !

कुणाशी बोलू

कुणाशी बोलू नये असं वाटलं काहीतरी लिहावंसं वाटलं .

इथून साप

इथून साप सळसळत गेलाय् म्हणून हिरवळ इथली अंग चोरून बसलेली .

हिरव्या रंगावर

हिरव्या रंगावर लालशेंदरी ठिपके झाडीमधून डोकावणारे कौलारू घरांचे झुबके .

आकाशावर कविता

आकाशावर कविता रेखाटणार होतो पण , चांदण्या जागा अडवून बसल्यात ना !

कुंपणावर

कुंपणावर  सांदीकोपर्‍यात एका सापाची चमकतेय कात .

चालताना ठेच

चालताना ठेच लागली मख्ख दगडाकडे पाहिलं त्याची कीव आली . .

घाई करतायत

घाई करतायत फुलं प्राजक्ताची अंगणात सडा टाकण्याची .