Currently browsing category

मु़क्तक / कतआ

सरत्या जुन्यास कोणी

सरत्या जुन्यास कोणी माझी कथा विचारा . . तेव्हा ज्वलंत होतो मी पेटता निखारा . . ! सोने कसास आता माझ्याशिवाय लागे . . नकलीच माल असतो बहुधा चकाकणारा !

काल माझे बादशाही तख्त होते . .

काल माझे बादशाही तख्त होते . . काल हे सारेच माझे भक्त होते भेट नजराणे मला जे देत आले , आज त्यांचे हात अगदी रिक्त होते !

दुनियेत याचकांची

दुनियेत याचकांची वस्ती महान आहे . . आकाश देउनी मी येथे लहान आहे ! ओझ्यास एकटा मी , ते चालले खुशाल . . मी कोरडया जिभेचा , त्यांना तहान आहे !

हळव्या गतस्मृतींचे

हळव्या गतस्मृतींचे मी बांधलेत वाडे बाहेरच्या जगांनो लावून घ्या कवाडे . . ! स्वार्थास मी कधीही नाही सलाम केला म्हणुनी हयातभरचे माझे मुके पवाडे . .  

मशिदीतही नसे मी

मशिदीतही नसे मी , किंवा मठीत नाही चित्रातल्याप्रमाणे मी चोकटीत नाही नवसास पावतो मी हे तेवढेच खोटे तुमचे नशीब काही माझ्या मुठीत नाही !

तुझ्या-माझ्या अंगणाला

तुझ्या-माझ्या अंगणाला आली कशानं नव्हाळी प्रकाशाच्या पावलांनची उभी दारात दिवाळी . .   थोडं आपुल्या घरचं टाकू तिच्या पदरात मोठ्या आनंदानं म्हणू ‘ ही घे , उजेडाची वात ! ‘    

भिक्षा . . .

प्रतीक्षेत दारांपुढे अंगणे घरांशी अशा क्षणभरी थांबणे शुभेच्छास टाकून झोळीमधे पुन्हा मार्ग अपुला पुढे चालणे !    

गझल हॄदयात

      गझल हॄदयात फुलणारी निखार्‍याची कळी आहे गझल डोळ्यात . . चंद्राच्या दिव्याची का़जळी आहे गझल हितगूज प्रीतीचे मुक्या ओठी …

संपल्यावर द्यूत

संपल्यावर द्यूत , फासे का पुन्हा फेकायचे ? दान उलटे पडत गेले . . ते आता विसरायचे ‘ मी रितीने खेळलो ‘अन  …

मातीचा संस्कार

मातीचा संस्कार गझल अन् प्रीतीचा शॄंगार गझल प्रतिभेच्या दरबारामधला प्रचितीचा सत्कार गझल कधी भावना झुळूक होते..होते झंझावात कधी अबोल ओठी मग झुलतो,तो …

मी घरादाराविनाही . . .

– मी घरादाराविनाही एकटयाने राहतो . . नेसतो वारे , धुके अन् पावसाने नाहतो सावल्यांच्या मांडवांची ही तयारी थांबवा . . नग्न …

सोनशेंदरी रंगाचे

सोनशेंदरी रंगाचे तुझे पहाटचे पाय कळी अल्लड दाखवी तुझे उमलते वय . . कसा वार्‍याला लागला तुझ्या सौंदर्याचा वास आला वेचत वेचत …