Currently browsing category

दोहा

पक्के मडके ना ठरे

पक्के मडके ना ठरे ,छान भाजल्यावीण बंदे नाणे नाकळे , छन्न वाजल्यावीण  

थोडेसे आयुष्यही

दोहाप्रकार  :  गयन्द / गदुकल थोडेसे आयुष्यही , पुरते अमरपणास . . . क्षणभर चमके वीज , पण उजळी सर्व जगास !

नेम निसर्गाचा कधी . .

दोहाप्रकार   : मर्कट नेम निसर्गाचा कधी मोडू नये म्हणून . . . फळ आल्यावर जातसे , फूल झाड सोडून !

उच्च पदावर जातसे

दोहाप्रकार  : हंस उच्च पदावर जातसे , थोर जरी  बिघडून . . . नम्र राहतो आरसा , वरचे पद मिळवून !

दु:ख हेच

दु:ख हेच की , व्हायची . . अपुली डोळ्याआड . . पिकली पाने पाडते , वार्‍याकरवी झाड !

माती धरते तापता

दोहा प्रकार :  मंडुक माती धरते तापता, पर्जन्याची आस . . फुकट न त्रुष्णा भागवी . . देई गंध जगास !

साखरेसम भाग्य

साखरेसम भाग्य नसे , रुचीत नसता खोट . . कैरीला बघ लावुनी , कधी मिठाचे बोट !

मातीच्य पेढीत तू

दोहा प्रकार  :  शरभ मातीच्या पेढीत तू ,  ठेवी एकच बीज एकाचे लाखो करी , कोण तिच्याखेरीज ?

भू , जल , तेज

भू , जल , तेज , समीर , नभ . .  तत्वे असता तीच , धर्म पंथ का भांडती . . ? …

ज्ञानी तूच

दोहाप्रकार :  करभ ज्ञानी तूच जितेपणी , पण झाल्यावर राख , कोण ठरे ज्ञानी बहू ? तो मनकवडा काक !

ठिणगी एक

ठिणगी एक पुरी पडे , जाळायाला रान ! चुगली एक पुरी पडे , फुंकायाला कान !

सूर्य कसा स्थिर

दोहाप्रकार :  नर सूर्य कसा स्थिर एकटा . . मन अजुनी साशंक फिरती पाळत ठेवण्या , ग्रहचंद्रादी लोक !

सत्याला जिंकायची

सत्याला जिंकायची , आवश्यकता काय ? विजयी जन्मापासुनी . . त्यास नसे पर्याय !