Currently browsing category

कविता

काही हायकू : कवी वा. न. सरदेसाई

  क्र. हायकू——————————————- ०१. मी फूल खुडलं त्याआधी त्याला डोळे भरून पाहिलं . ०२. दूर पडलेली लख्ख नदी मला वाटते चटदिशी इथूनच …

इंगित . . .

  ओवी / अभंग वा. न. सरदेसाई    इंगित  . . .   माजं नाव वारकरी माज्या बापाचं इट्टल उब्या आयुक्षात बगा न्हाई आमचं पटलं . .   झालं बांधून बाशिंग माजा संसार रंगला दोन पोरं फुलावाणी चार बैलबी मोटंला . .   गेलो आखारी वारीत मायबापाला सांगाया …

वारसा . .

कोकणच्या पाळण्यात माझे बाळपण गेले झुल्यावर टांगलेले रनकुसुमांचे झेले . .   लाल चौथर्‍याची चड्डी शर्ट पांढरा अंगात शाळा माझी वाट बघे …

सरत्या जुन्यास कोणी

सरत्या जुन्यास कोणी माझी कथा विचारा . . तेव्हा ज्वलंत होतो मी पेटता निखारा . . ! सोने कसास आता माझ्याशिवाय लागे . . नकलीच माल असतो बहुधा चकाकणारा !

श्रीरामरक्षा ‘अभंगात्मक भावानुवाद : – श्री.वा. न. सरदेसाई

श्रीरामरक्षा ‘अभंगात्मक भावानुवाद : -श्री.वा. न. सरदेसाई   पापविनाशिनी इच्छाफलदायी सुज्ञाने वाचावी . . रामरक्षा  ।।   करो तो राघव रक्षण शिराचे माझिया भाळाचे दाशरथी  ll  १ …

काल माझे बादशाही तख्त होते . .

काल माझे बादशाही तख्त होते . . काल हे सारेच माझे भक्त होते भेट नजराणे मला जे देत आले , आज त्यांचे हात अगदी रिक्त होते !

जळाविना जगते मासोळी . . !

समस्यापूर्तीसाठी दिलेली ओळ  ” जळाविना जगते मासोळी . . ! “   चवदा पानी वनवासाचा पवित्रता ती लेख वाचते अशोकवनिंची अशुभ शांतता मूक होउनी मनांत हसते . .   अगतिकता नयनांत तरारे कशा दिसाव्या पुढच्या ओळी रामायण तें अपुरे म्हणुनी जळाविना जगते मासोळी . . !

दुनियेत याचकांची

दुनियेत याचकांची वस्ती महान आहे . . आकाश देउनी मी येथे लहान आहे ! ओझ्यास एकटा मी , ते चालले खुशाल . . मी कोरडया जिभेचा , त्यांना तहान आहे !

हळव्या गतस्मृतींचे

हळव्या गतस्मृतींचे मी बांधलेत वाडे बाहेरच्या जगांनो लावून घ्या कवाडे . . ! स्वार्थास मी कधीही नाही सलाम केला म्हणुनी हयातभरचे माझे मुके पवाडे . .  

मशिदीतही नसे मी

मशिदीतही नसे मी , किंवा मठीत नाही चित्रातल्याप्रमाणे मी चोकटीत नाही नवसास पावतो मी हे तेवढेच खोटे तुमचे नशीब काही माझ्या मुठीत नाही !

तुझ्या-माझ्या अंगणाला

तुझ्या-माझ्या अंगणाला आली कशानं नव्हाळी प्रकाशाच्या पावलांनची उभी दारात दिवाळी . .   थोडं आपुल्या घरचं टाकू तिच्या पदरात मोठ्या आनंदानं म्हणू ‘ ही घे , उजेडाची वात ! ‘    

गेलें तेज कधीच लोपुनि तरी कां ही वृथा वल्गना ?

समस्यापूर्तीसाठी दिलेली ओळ  गेलें तेज कधीच लोपुनि तरी कां ही वृथा वल्गना ? ” ग्यावा भाग गमे मला प्रियकरा , सौदर्यस्पर्धेमधें गोले सुंदरता , जरा सरकली जी चाळिशीच्या पुढें चष्मा सावरुनी  हळूच तिजला तो सांठवी दृष्टित लांबोळा झणिं चेहरा बदलतां हो प्रश्नचिन्हांकित थांबूनी क्षण नाथ तीस म्हणतो – ” स्पर्शी कशी कल्पना . . गेलें तेज कधीच लोपुनि तरी कां ही वृथा वल्गना ? ” ( व्याकरण तेव्हाचे )

वाटे , हा जणुं अमृतासि पिउनी पृथ्वीवरी पातला . . !

समस्यापूर्तीसाठी दिलेली ओळ  वाटे , हा जणुं अमृतासि पिउनी पृथ्वीवरी पातला . . ! खादीचा अतिशुभ्र अंगिं डगला , टोपी शिरीं देखणी हस्तीदंति सुहास्य पेरित  फिरे हा पांच वर्षातुनी कोठेही घुसतो कुठूनहि ,वदे – ‘ सेवेता आम्हां रुची ! ‘ भाषा गोड अतीव ओघवतिही आश्वासनी निस्तुला वाटे , हा जणुं अमृतासि पिउनी पृथ्वीवरी पातला  . . !  

पक्के मडके ना ठरे

पक्के मडके ना ठरे ,छान भाजल्यावीण बंदे नाणे नाकळे , छन्न वाजल्यावीण