कळीला त्रास होता . .

सूट घेतलेले अक्षरगणवृत्त : सुकेशी
लक्षणे : लगागागा लगागा
छंदोरचना पृष्ठ क्र.२७८

कळीला त्रास होता . .
वयाला वास होता !

जगाला हार दिसला . .
फुलांचा फास होता !

असावी एकटी मी . .
तुला अदमास होता .

कुणी कोणा पुसावे . .
‘ कसा मधुमास होता ? ‘

तुझा विश्वास मजला
जगाया श्वास होता !

हिला सहवास नव्हता . .
तिला वनवास होता !

प्रतिक्रिया टाका