कळीला कळीला . .
कळीला कळीला फुलू द्यायचे
जगाला उद्या दर्वळू द्यायचे . .
घरी स्वागताला उभी तोरणे
प्रतीक्षेत दारांपुढे अंगणे
तिथे पावलांना वळू द्यायचे . .
हळू चोच चोचीमधे गुंतता
जपावी फुलासारखी शांतता
मुक्या हॄदगतांना उलू द्यायचे . .
पुजावे असे संस्कॄतीचे ठसे
उरी घेउनी जी समाधी वसे
तिथे दोन अश्रू ढळू द्यायचे . .
पुढे चालताना भले कैकदा
रुतो आपुल्या पायि काटाखडा
कुणाला कशाला कळू द्यायचे
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा