कड्याकुलपांत वावरती
अक्षरगणवृत्त : हिमांशुमुखी
गण : लगाललगा लगाललगा लगाललगा लगाललगा
कड्याकुलपांत वावरती अता सगळीअशीच घरे . .
घरे कसली , तुरुंगच हे .. फटींपुरती खुलीच घरे !
इथे तर माळरान असे . असे उघड्यावरी वसती . .
नभाहुन उंचउंच अशी इथे नव्हती कधीच घरे .
किती झगडे जरी असले , तरे पण उंबर्यांमधले . .
सदा दुनियेस हे दिसती वरून तरी सुखीच घरे !
अलीकडच्या घरांस कुठे हवा तितका तजेलपणा ?
जुनी टुमदार रंगवता कशी दिसती नवीच घरे !
पिढ्या दरसाल रंगवता , कुडी थकलीजरी असली ,
कुठे थकली मनेअजुनी उद्याकरिता उभीच घरे !
पिले घरट्यांतुनी भुरकन् विदेश पहावया उडली . .
कधी परतायचा बघती , निरोप, चिठी उगीच घरे !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा