ओढाळ कसे . .
वृत्त : पादाकुलक
गण : एकूण १६ मात्रा. प्रत्येक चरणात ‘ यति ‘ ८ व्या मात्रेवर
ओढाळ कसे हे मन इतके ?
जितके बांधा तितके सुटके !
जितके बांधा तितके सुटके !
चालून जराशी वाट थके
थेटच केला मी प्रश्न तुला
का उत्तर मग अमकेतमके ?
दार जरी उघडेना कोणी ,
उंबरठा मज टाळू न शके .
ती इतकी नाजुक , कोमल की ,
तिज चंद्राचे बसती चटके !
अनुभव माझा मित्र म्हणतसे ,
: अपुले परक्यांपेक्षा परके.
आयुष्य मला सोडुनि जाता ,
हा जीव तुझ्यातच का अडके ?
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा