आभाळाशी जुळल्या . .
वृत्त : कर्णफुल्ल
गण : एकूण मात्रा १६ (विद्युन्माला ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )
आभाळाशी जुळल्या तारा . .
निढळाच्या ह्या श्रावणधारा !
लाटे , तू , समजून मला घे . .
तू चंचल , मी ठाम किनारा !
पडलेले दे , पीस मयूरा ,
तुजला हो लखलाभ पिसारा !
ओझरती दिसतेस मला तू . .
बांध न इतका पायी पारा !
होते राख कुणीही जळता . .
होतो एखादा . . अंगारा !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा