ओठ शिवलेल्या टिपेवर . .
वृत्त : राधा
लक्षणे :गालगागा गालगागा गालगागा गा
ओठ शिवलेल्या टिपेवर उसवलो आहे
मोकळे बोलायला मी लागलो आहे !
पाहते माझ्याकडे ती अजब नजरेने
मी जसा काही नव्याने भेटलो आहे .
वादळाने शेकडो तुटल्या जरी फांद्या ,
मी उभ्या खोडात कोठे मोडलो आहे ?
मार्गदर्शन थांबवा आता तरी तुमचे . .
जायचे आहे तिथे मी पोचलो आहे !
पांढरी कसली निशाणे दाविता त्यांना ?
मी कुठे अद्याप पुरता झुंजलो आहे ?
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा